फरार आरोपी मोनुसिंग बावरी अटकेत

On: May 24, 2021 5:01 PM

जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत वान्टेड आरोपी मोनुसिंग बावरी यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मोनुसिंग हा गेल्या एक वर्षापासून फरार होता. त्याला यापुर्वी हद्दपार देखील करण्यात आले होते. गेल्यावर्षी त्याने तांबापुरा भागात एका महिलेची गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय आपल्या साथीदारांच्या मदतीने परिसरात दहशत माजवण्याचा, दगडफेकीचा प्रकार केला होता.

फरार आरोपी मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (22) रा. शिकलकर वाडा शिरसोली नाका तांबापुरा जळगाव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 1051/2020 भा.द.वि.307, 395, 397, 456, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोनुसिंग बावरी यास शिताफीने ताब्यात घेण्याकामी पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, हेमंत कळसकर, मुदस्सर काझी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, चालक सुरेश अहिरे आदींनी सहभाग घेतला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment