जळगाव एलसीबीची कारवाई

On: May 25, 2021 9:03 PM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या आजच्या एका कारवाईत वान्टेड आरोपी अटक करण्यात आला असून दुस-या एका कारवाईत इन्व्हर्टर बॅटरी चोरणारे अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आली आहेत.

पहिल्या कारवाईत पोलिसांच्या अभिलेख्यावरील वान्टेड आरोपी दिपक निळकंठ जावळे (सुप्रिम कॉलनी जळगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार आर्थिक स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याला आज अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, प्रदिप पाटील, महेश महाजन, संतोष मायकल यांनी सहभाग घेतला.

दुस-या कारवाईत पिंप्राळा हुडको भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर बॅटरी चोरणारे अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी आरोग्य कर्मचारी सुनिल पाटील यांच्या तक्रारीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या विधीसंघर्षीत बालकांसह त्यांनी घरात लपवून ठेवलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, विजय पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, पंकज शिंदे, यांनी सहभाग घेतला. पुढील कारवाईसाठी त्यांना रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment