फरार पोलिस नाईक विलास सोनवणे एसीबीच्या जाळ्यात

On: May 27, 2021 7:48 PM

जळगाव : लाचेची मागणी केल्याप्रकरणी अ‍ॅंटीकरप्शन विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून फरार पोलिस नाईक विलास बुधा सोनवणे यास आज जळगाव शहरातून अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीस शिक्षा होणार नाही अशा पद्धतीने कादगपत्र तयार करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्याच्या मोबदल्यात 19 हजार रुपयांची लाच धरणगाव येथे नेमणूकीस असलेले पोलिस नाईक विलास सोनवणे यांनी मागितली होती. या प्रकरणी पोलिस नाईक विलास सोनवणे याच्याविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला होता. पोलिस नाईक विलास सोनवणे याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला 8 मार्च 2021 रोजी भाग 5 गु.र.न. 119/21 भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन 2018 चे कलम 7 व भा.द.वि. 392, 201, 186 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस नाइक विलास सोनवणे फरार होता. आज 27 मे रोजी एसीबी जळगाव युनीटमधील धडाकेबाज पो.हे.कॉ.दिनेशसिंग पाटील यांना सदर आरोपी जळगांव शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार हे.कॉ. दिनेशसिंग पाटील यांनी आपले कौशल्य वापरुन फरार पोलिस नाईक विलास सोनवणे यास शिताफीने आपल्या जाळ्यात ओढून ताब्यात घेत वरिष्ठांसमक्ष हजर केले. पो.हे.कॉ. दिनेशसिंग पाटील यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment