जळगावात अल्पवयीन मुलाची गळफास घेत आत्महत्या

On: May 29, 2021 7:10 PM

जळगाव : घरात कुणी नसतांना जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रितेश गुलाबराव मोरे (17) या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रितेश याने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

रितेश हा पाण्याचे जार वितरणाचे काम करत होता. त्याचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्याचे वडील रात्रपाळीला कामाला गेले होते. आई व भाऊ धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. घरात कुणी नसतांना त्याने आत्महत्या केल्याचे समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. शव विच्छेदनानंतर दुपारी दोन वाजता पिंपळकोळा (ता. एरंडोल) या मुळ गावी रितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment