घरफोडीचा आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

On: May 30, 2021 2:28 PM

जळगाव : एमआयडीसी पोलिसांना अभिलेख्यावरील घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गोविंदा रविंद्र बाविस्कर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोविंदा बाविस्कर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 1272/2021 भा.द.वि. 380 नुसार गुन्ह्याची नोंद आहे. तो भुसावळ शहरात आला असल्याची गुप्त माहिती पो.नि. दिलीप भागवत यांना समजली होती. त्यानुसार पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रविद्र बि-हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील,पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment