पो.नि. गुट्टे यांच्याविरुद्ध अत्याचाराचा आरोप

On: June 4, 2021 7:39 PM

वाशिम : वाशिम स्थानिक गुन्हे शाखेतील महिला पोलिस कर्मचा-यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिस निरीक्षक विश्वकांत गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. विश्वकांत गुट्टे हे सध्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलिस स्टेशनला कार्यरत असल्याचे समजते. सदर गुन्हा विविध कलमानुसार वाशिम शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

सन 2007 मधे विश्वकांत गुट्टे हे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनला पोलिस उप निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांची तक्रारदार महिला कर्मचा-यासमवेत ओळख झाली होती असे म्हटले जाते. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका गायकवाड करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment