दोघे गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार

On: June 6, 2021 2:04 PM

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. राहुल रामचंद्र ब-हाटे (27) रा. रामेश्वर कॉलनी व गोलु उर्फ दत्तु नारायण चौधरी (26) रा. तुकाराम वाडी जळगाव अशी दोघांची नावे आहेत. दोघांवर शरिराविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 55 नुसार त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशाने हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता तसेच पाठपुरावा देखील करण्यात आला होता. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दोघांना दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईकामी पोलिस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अंमलदार किशोर पाटील व मुकेश पाटील, पो.कॉ. सचिन पाटील, योगेश बारी यांनी कारवाई केली आहे. पोलिस अंमलदार इमरान सैय्यद व गोविंदा पाटील यांनी दोघांना धुळे शहरात स्थानबद्ध केले आहे. अजुन काही गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment