एलसीबी कर्मचा-याची वर्दी चोरी

On: June 7, 2021 8:54 PM

भंडारा : जळगाव शहरात काही दिवसांपुर्वी बंद घरातून चोरट्याने शिक्षीकेच्या साड्यांची चोरी केली होती. या घटनेनंतर भंडारा येथील एका चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भंडारा येथील चोरीच्या घटनेत चोरट्याने चक्क एलसीबी कर्मचा-याचा गणवेश चोरी केल्याचे उघड झाले आहे. या वर्दीसोबत चोरट्याने नेम प्लेट, शर्टावरील पोलिस टॅग, बक्कल क्रमांक असलेला पट्टा आणि दोनशे रुपये मुल्य असलेली बॅग चोरुन नेली आहे. या प्रकरणी भंडारा शहर पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे.

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेत कौशिक गजभिये नावाचा कर्मचारी नेमणूकीला आहे. भंडारा शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वार्डात गजभिये भाड्याच्या खोलीत निवासाला आहे. शनिवारच्या रात्री पो.कॉ. कौशिक गजभिये रात्रपाळीच्या ड्युटीला होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील बंद घरात हॅंगरवर त्यांचा दुसरा युनिफॉर्म टांगलेला होता. या युनिफॉर्म सोबत नेमप्लेट, पोलिस टॅग, बेल्ट देखील होता. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडून आत प्रवेश मिळवत चोरीचा प्रताप केला. दुस-या दिवशी रात्रपाळीची ड्युटी आटोपून गजभीये घरी परत आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भंडारा शहर पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment