मंत्री नितीन गडकरी यांचा नकली भाऊ – पिता अटकेत

On: June 10, 2021 7:37 PM

डोंबिवली : मंत्री नितीन गडकरी माझा भाऊ आहे. आयकर विभागाकडून पकडण्यात आलेले सोने कमी किमतीत माझ्या ओळखीने तुम्हाला मिळवून देतो अशी थापेबाजी करणा-या गडकरी बाप लेकाला विष्णू नगर पोलिसांनी बंगळुरु येथून ताब्यात घेत अटक केली आहे. राजन गडकरी व आनंद गडकरी अशी अटकेतील दोघा बाप लेकांची नावे आहेत. दोघांचे आडनाव गडकरी असले तरी ते मंत्री नितीन गडकरी यांचे भाऊ आणी वडील नाहीत.

आमचे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सोन्याचे दुकान असल्याचे पळसमकर यांना राजन गडकरी व त्यांचा मुलगा आनंद गडकरी या जोडीने सांगितले होते. या जोडीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फेब्रुवारी 2020 मधे पळसमकर यांनी या दोघांना पाच लाख रुपयांचा चेक दिला होता. लवकरच दोन महिन्यात तुम्हाला तुमचे सोने मिळेल असे पळसमकर यांना सांगण्यात आले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पळसमकर यांनी विष्णू नगर पोलिस स्टेशन गाठत या गडकरी पिता पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय साबळे यांच्या निर्देशाखाली स.पो.नि. महेश जाधव व त्यांच्या सहका-यांनी दोघांना बंगळुरु येथून ताब्यात घेत अटक केली. दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 14 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गडकरी पिता पुत्राने त्यांच्या नातवाला देखील सोबत नेले होते. त्यामुळे त्यांच्या सुनेने नातू बेपत्ता झाल्याबाबत विष्णू नगर पोलिसात तक्रार दिली होती. दोघांच्या अटकेनंतर नातू देखील मिळाला. नातवाला त्याच्या आईकडे सोपवण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment