फरार चोरटा रिक्षासह अटकेत

On: June 12, 2021 5:17 PM

जळगाव : चोरीच्या रिक्षेसह फरार चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून रिक्षेसह ताब्यात घेतले आहे. चोरीस गेलेल्या रिक्षेचा चोरट्यासह शोध लागल्यामुळे तक्रारदार रिक्षा चालकाचा जिव भांड्यात पडला आहे.

अकील शहा मुसा शहा हा रिक्षा चालक असून त्याने गेल्या महिन्यात रिक्षा (एमएच 19 बीजे 2081) विकत घेतली होती. या रिक्षाच्या खरेदी विक्रीची प्रक्रीया अजून सुरु होती. दरम्यान त्याने रिक्षा आपल्या ताब्यात घेत मेहरुण येथील त्याच्या राहत्या घरी आणली होती. गेल्या महिन्यात 17 मे रोजी रात्री त्याच्या घराबाहेरुन सदर रिक्षा चोरीला गेली होती. काही दिवस शोध घेऊन देखील रिक्षा त्याला कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्याने एमआयडीसी पोलिस स्टेशनला रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, प्रदीप पाटील, मुदस्सर काझी, जमील शेख यांनी जबीउल्ला खान गुलजार खान (रा. दुर्गा चौक जळगाव जामोद जि. बुलढाणा) यास जळगाव जामोद येथून ताब्यात घेत अटक केली. त्याच्या ताब्यातून त्याने चोरी केलेली रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने रिक्षावरील क्रमांक खोडून टाकला होता. या गुन्ह्यातील त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. यापुर्वी त्याने अशा स्वरुपाचे गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment