अभिनेत्रीवर तिच्या निवासस्थानी बलात्कार

On: July 10, 2020 7:05 PM

पश्चिम बंगालमधील बिजॉयगढ विभागात एका 26 वर्षीय अभिनेत्रीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने जादवपूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. या अभिनेत्रीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या अभिनेत्रीने साथ भाई चम्पा यांसारख्या इतर काही मालिकेत काम केले आहे.

5 जुलै रोजी या अभिनेत्रीच्या फ्लॅटवर तिचा परिचित व्यावसायिक तिला भेटण्यासाठी आला होता. घरात ती एकटी असल्याचे पाहून त्याने गैरफायदा घेतला. अभिनेत्रीने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे की ती फ्लॅटवर एकटी राहते.आरोपीने तिच्या सोबत केलेल्या कृत्याचा व्हीडीओदेखील तयार केला.

आरोपीने पीडितेला धमकी दिली की, याविषयी कुणाला सांगितले तर हा व्हिडिओ व्हायरल करेन. तरी देखील या अभिनेत्रीने पोलीसात तक्रार दाखल केली.या घटनेबद्दल आरोपी विरोधात भा.द.वि.कलम 376 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे पिडीत अभिनेत्रीसोबत प्रेम संबंध होते. मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी ती कोलकाता येथे राहते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment