पत्नीच्या हत्येसाठी पतीने काढले कर्ज

On: July 11, 2020 1:59 PM

पटना : मेहुणीवर प्रेम जडल्यामुळे चक्क गर्भवती पत्नीला ठार करण्यासाठी बॅंकेतून कर्ज काढण्याचा प्रकार बिहारमधील गोपाळपूर पोलिस स्टेशन परिसरात उघडकीस आला. आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिस तपासात हा प्रकार समोर आला आहे.

9 जुलै रोजी गर्भवती रुबीदेवी या विवाहितेची रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रुबी आणि तिचा पती शंभू यांच्यात कायम वाद होत असत. त्यातच शंभूचे मेहुणीवर प्रेम जडले होते. त्याला पत्नी रुबीपेक्षा मेहूणी जवळची वाटत होती. शंभूची पत्नी रुबी गर्भवती होती. तिला अगोदरच दोन मुली होत्या व आता तिसरी मुलगीच होणार अशी शंभू यास भिती वाटत होती.

मेहूणीवरील प्रेम व तिसरी मुलगी होण्याची भिती यातून त्याने थेट पत्नीची हत्या करण्याचा कट रचला. हत्या करणा-या व्यक्तीला अ‍ॅडव्हांस देण्यासाठी व हत्या झाल्यानंतर द्याव्या लागणा-या रकमेसाठी लॉंड्री चालक शंभूने कर्ज काढण्याचा प्रकार केला. ठरल्यानुसार 9 जुलै रोजी पत्नी रुबीदेवी हिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पती शंभूला तपासाअंती ताब्यात घेत अटक करण्यात आली.रुबीची गोळी झाडून हत्या करणा-या ऋषीचा तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment