सराईत गुन्हेगाराची तिक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या

On: July 11, 2020 7:41 PM

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात काही जणांनी घरात घुसून एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करत आज निर्घृण खून केला. या हल्ल्यात खून झालेल्या व्यक्तीचा हात देखील कापला गेला. या घटनेने कोंढव्यात पुन्हा एकवेळा ‘ मुळशी पॅटर्न’ सारखा थरारक प्रकार घडला आहे.

घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ (कोंढवा) असे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पप्पू पडवळ हा पोलिस दफ्तरी सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी तो कारचालक म्हणून काम करत होता.

यापुर्वी एका टोळीकडून त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात बचावला होता. आता तो व्याजाने पैसे देण्याचा अवैध व्यवसाय करत होता. कोंढव्यातील ब्रम्हा काँट्री इमारतीमधील पाचव्या मजल्यावर तो रहात होता.

गेल्या काही दिवसांपासून तो घरात एकटाच होता. तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याचे नातेवाईक घरी आले. त्यावेळी तो तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. घटनेची  माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पडवळ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment