सरकारी कंत्राट मिळवून देण्याचे आमिष ;२२ लाख हडपले

On: July 11, 2020 10:41 PM

नागपूर : सरकारी कंत्राट मिळवून देतो असे सांगत आमिष दाखवत आरोपीने एकाचे २२ लाख ५० हजार रुपये हडपण्याचा प्रकार नागपुरात घडला. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव आहे. तो वर्धा शहारातील हिंद नगरातील रहिवासी आहे.

फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव अतुल नारायण गुजर (५४) असून ते बजाज नगरात राहतात. आरोपी मसराम याने गुजर यांना सन २०१६ मध्ये प्रोटीन पुरवण्याचे सरकारी कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यातून लाखो रुपयांचा फायदा होईल असेही सांगितले.

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गुजर यांनी त्याला कंत्राट मिळवून देण्यास सांगितले.वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाखाली आरोपी मसरामने गुजर यांच्याकडून १७ आॅक्टोबर २०१६ ते २ आॅगस्ट २०१९ या काळात २२ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र गुजर यांना कंत्राट मिळवून दिले नाही.

गुजर यांनी आपली रक्कम परत मागितली. मात्र मसराम याने गुजर यांची रक्कम परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे गुजर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.त्याची चौकशी सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment