सैराटची झाली पुनरावृत्ती,बहिणीशी लग्न केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

On: July 12, 2020 12:39 PM

सांगली : बहिणीला पळवून नेत लग्न केल्याच्या रागातून कवठेपिरान (ता. मिरज) येथील तरुणाचा गुप्तीने वार करून खून करण्यात आला. ओंकार माने (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे.

निखिल सुधाकर सुतार (२१) असे हल्लेखोर संशयिताचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर तो स्वतः पोलिस स्टेशनला हजर झाला.सहा महिन्यापूर्वी ओंकार माने या तरुणाने निखिलच्या बहिणीशी पळून जाऊन लग्न केले होते.

लग्नानंतर काही दिवसांनी तो पुन्हा गावात राहण्यासाठी आला होता. याचा निखिलच्या मनात राग होता. मध्यरात्रीच्या सुमारास निखिलने ओंकार यास एकांतात गाठून त्याच्यावर गुप्तीने वार केला.

अतिरक्तस्त्रावमुळे ओंकारचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित निखिल स्वतः सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांपुढे शरण आला. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment