जळगावात खूनाची घटना – मध्यरात्री गुन्हा दाखल

On: July 11, 2021 6:32 AM
crimeduniya

जळगाव : जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (21) रा.हिराशिवा कॉलनी) याचा चॉपरने भोसकून खून करण्यात आल्याची घटना शनिवाच्या रात्री घडली. महेश पाटील याचा खून बापू संतोष राजपूत (44) रा.हिराशिवा कॉलनी याने केल्याचे समजते.

याप्रकरणी मध्यरात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयत व संशयीत आरोपी बापू राजपूत यांच्यात जुना वाद होता अशी माहिती मिळत आहे. बापू राजपूत हा एकासह पाण्याच्या टाकीजवळ मद्यप्राशन करत असतांना हा हल्ला व हल्ल्यातून खून झाला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment