प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

On: July 16, 2021 5:31 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विष्णापूर पासून जवळच असलेल्या पहाडी भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना आज दुपारी घडली आहे. शिरपूर एअरपोर्टचे शिकाऊ विद्यार्थ्यांसाठी असलेले हे विमान आहे. या घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील आदिवासी बांधवांनी गर्दी केली आहे. या घटनेत नेमकी किती प्राणहानी झाली अथवा नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment