बाजारपेठ पथकाने केली यावल दरोड्यातील फरार आरोपीस अटक

On: July 18, 2021 12:49 PM

जळगाव : यावल येथील सराफी दुकानावर बंदुकीच्या धाकावर जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी (श्रीराम नगर भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.121/2021 भा.द.वि. 392 तसेच आर्म ॲक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल आहे.

भुसावळ उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या निर्देशाखाली पो.नि. दिलीप भागवत व त्यांच्या सहका-यांनी आज सकाळी फरार संशीत रुपेश उर्फ भनभन अशोक चौधरी यास त्याच्या राहत्या घरातून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या निर्देशाखाली पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, रमन सुरळकर,उमाकांत पाटील, पो. कॉ. विकास सातदीवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, श्रीकृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बिऱ्हाडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment