मोटार सायकल चोरटा अटकेत

On: July 18, 2021 6:10 PM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातील वैजापूर मैलाने कर्जाने जिरायत पाडा परिसरातून रमेश शाहदा पावरा (जाधव) या मोटार सायकल चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याकडे चोरीची होंडा शाईन मोटार सायकल आढळून आली. सदर चोरीची मोटार सायकल त्याने चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे कबुल केले. सदर मोटार सायकल चोरीप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला भाग -5 गु.र.न. 79/2020 भा.द.वि. 379 नुसार गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या निर्देशाखाली स.फौ. अशोक महाजन, पोहेकॉ. रविंद्र गायकवाड,संदीप पाटील, सुरज पाटील, प्रदीप पाटील, प्रविण मांडोळे, परेश महाजन, रावसाहेब पाटील आदींनी तपासकामी सहभाग घेतला. आरोपी रमेश पावरा यास पुढील तपासकामी चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment