तोरणमाळ खो-यात कोसळली कार – आठ मृत्युमुखी

On: July 19, 2021 8:23 AM

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या तोरणमाळ खोऱ्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सिंदिदिगर घाटात प्रवासी घेऊन जात असलेल्या क्रुजर गाडीचा अपघात झाला आहे. क्रुझर वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पंधरापेक्षा अधिक प्रवासी जखमी असल्याचे समजते.

रविवारी दुपारी शमलेट ता. पाटी जिल्हा बडवाणी (म.प्र.) येथील रहिवाशी नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील चिखली पुनर्वसन येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी येत होते. या अपघातात आठ जण मरण पावले असल्यामुळे खळबळ माजली आहे.

सहा महिन्याच्या कालावधीत या रस्त्यावर झालेला हा दुसरा भीषण अपघात आहे. दुर्गम भाग असल्यामुळे मदतकार्यात नेहमी अडथळे येत असतात. जखमींना तोरणमाळ, म्हसावद परिसरातील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्याचे काम सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment