अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक

On: July 20, 2021 8:36 AM

मुंबई : अश्लील चित्रफितींची निर्मिती करुन त्या अ‍ॅपवर अपलोड केल्याप्रकरणी मध्यरात्री प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यास अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्याविरोधात पोलिस पथकाच्या हाती पुरावे लागले आहेत.

मुंबई गुन्हे अन्वेशन शाखेने अश्लिल चित्रफितींची निर्मीती व त्या अ‍ॅपवर अपलोड केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात एक गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या म्होरक्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा असल्याचे तपासात पुढे आले होते. त्याला रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेची कुणकुण लागल्यामुळे राजकुंद्रा याने सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी गेल्या महिन्यात अर्ज दाखल केला होता.

वैद्यकीय चाचणीअंती राज कुंद्रा यास अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचा प्रॉपर्टी सेल राज कुंद्रा याची कसून चौकशी करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment