पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचे एक जुने ट्विट सध्या व्हायरल होत आहेत. या ट्विट्मधे राज कुंद्रा याने वेश्याव्यवसाय आणि अश्लीलता यातील फरकाची चर्चा केली होती.

याशिवाय राज कुंद्रा याने केलेले अजून एक ट्विट सध्या चर्चेत आले आहे. 3 मे 2012 रोजी राज कुंद्रा याने म्हटले आहे की “भारतात अभिनेते क्रिकेट खेळत आहेत, क्रिकेटपटू राजकारणात येत आहेत, राजकारणी पोर्न पाहत आहेत आणि पोर्न स्टार्स अभिनयाच्या क्षेत्रात येत असल्याचे ते ट्विट राज कुंद्रा याने केले होते.
अश्लिलता (पोर्न) विरुद्ध वेश्याव्यवसाय यातील फरक त्याने मांडला होता. कॅमेरासमोर सेक्स करण्यासाठी एखाद्याला/एखादीला पैसे देणे कायदेशीर आहे का? एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा नियम का?”, असा प्रश्न ट्विटच्या माध्यमातून विचारत राज कुंद्रा याने 29 मार्च 2012 रोजी केला होता.

अश्लिल चित्रपट तयार करुन ते काही अॅप्स व ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शीत केल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेने मुंबई येथे गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राज कुंद्रा म्होरक्या असल्याचे पुरावे मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.







