हॉटेल मॅनेजरचा डोक्यात दगड घालून खून

On: July 12, 2020 6:12 PM

सोलापूर : मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालून हॉटेल मॅनेजरचा खून झाल्याची घटना सोलापूर शहरात उघड झाली आहे. या हत्येने सोलापूर शहरात खळबळ माजली आहे.

कैलास परबळकर असे हत्या झालेल्या हॉटेल मॅनेजरचे नाव आहे. ब-याच वर्षापासून केलास परबळकर हा हॉटेलमधे मॅनेजर म्हणून कार्यरत होता. हॉटेलमधील सहकारी आकाश मंडल याच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर आकाश मंडल फरार झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील हिप्परगा गावानजीक हॉटेल सौरभ आहे. या हॉटेलमधे संशयीत आकाश मंडल व कैलास परबळकर असे दोघे कामाला होते. आकाश मंडल हा मुळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. शनिवारच्या रात्री दोघे हॉटेलवर मुक्कामाला होते.

रात्री कैलास झोपेत असतांना आकाश मंडल याने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचा संशय हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे. हॉटेलमधील सुमारे पस्तीस हजार रुपयांची रोकड व काही कागदपत्रे गायब झाली आहेत.

ती रोकड व कागदपत्रे आकाश यानेच पसार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  सोलापूर पोलीसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.

‘क्राइम दुनिया ‘ला फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (https://www.facebook.com/crimeduniyanews/) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

व्हाट्स अप्प ( https://chat.whatsapp.com/KbXSwZVvwhSGnc0IqyCEfI )

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment