तरुणाची मित्रांकडून निर्घृण हत्या

घरफोडी

मेरठ: मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आयटीआयमध्ये शिक्षण घेणा-या विस वर्षाच्या विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनीच निर्घृण हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते ४० फूट खोल बोअरवेलमध्ये फेकल्याचे ताब्यातील आरोपींचे म्हणणे आहे. मयत व बेपत्ता विद्यार्थ्याच्या शरीराचे तुकडे अद्याप सापडले नाहीत.

या प्रकरणी चौघा संशयित मित्रांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.२५ जून रोजी रूपक नावाचा तरुण पार्टीसाठी मित्रांसोबत गेला होता. मात्र तो घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्याचे कुटूंबीय हैरान झाले. त्यांना चिंता सतावू लागली.

त्यांनी लागलीच दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनला जावून रुपक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. काही जणांनी रूपक यास त्याच्या मित्रांसोबत पाहिले होते.या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्या चौघा मित्रांना चौकशीकामी ताब्यात घेतले. रूपकची हत्या केल्याचे चौघा मित्रांनी कबुल केले.

रूपकचे त्याच्या बहिणीच्या कारणावरून मुख्य संशयित आरोपी विकास सोबत वाद झाला होता. त्या वादामुळे विकास व त्याच्या मित्रांनी रूपकची गोळ्या घालून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येनंतर रुपकचा मृतदेह नेमका कुठे टाकला याबद्दल आरोपींकडून पोलिसांची दिशाभुल करण्याचे काम केले जात आहे. मृतदेह कधी शेतात पुरल्याचे तर कधी बोअरवेलच्या खड्ड्यात टाकल्याचे सांगत आहेत. सध्या चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

‘क्राइम दुनिया ‘ला फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (https://www.facebook.com/crimeduniyanews/) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

व्हाट्स अप्प ( https://chat.whatsapp.com/KbXSwZVvwhSGnc0IqyCEfI )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here