तरुणाची गोळ्या घालून हत्या

On: July 13, 2020 11:32 AM

पुणे : शहरातील पर्वती येथील शाहूनगर वसाहतीत तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.दत्तवाडी पोलीस स्टेशनला या खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे या तिघा संशयीतांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सौरभ महेश मोहोळ(२१) रा. लक्ष्मीनगर, पर्वती हा अमित मिलिंद सरोदे (२१) रा.जनता वसाहत, पर्वती सोबत रविवारी रात्री शाहू वसाहत येथील बालाजी होलसेल जवळ थांबला होता.त्यावेळी आरोपी ननावरे हा आपल्या साथीदारांसह तेथे आला. त्याने थेट अमितवर पिस्तुलातून गोळीबार सुरु केला. तसेच त्याच्या साथीदारांनी अमितच्या मानेवर, डोक्यात कोयत्याने वार देखील केले.

यशवंत कांबळे याच्या सांगण्यावरून संशयित आरोपींनी गोळीबार व कोयत्याने वार केले आहेत. पुर्ववैमनस्यातून हा प्रकार असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. घटनेनंतर नागरिकांनी दत्तवाडी पोलिसांना माहिती कळवली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरु केली. तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे अधिक तपास करत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment