जळगाव : पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील रहिवासी महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. अर्चना रमेश चव्हाण असे आत्महत्या करणा-या विवाहीतेचे नाव आहे. अर्चना चव्हाण यांनी आत्महत्या का केली याचा खुलासा होवू शकला नाही.

दरम्यान या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. कृष्णापुरी परिसरातील अंबिका किराणा दुकानाचे मालक रमेश चव्हाण यांच्या पत्नी व त्यांचे पती हे दोघे अपंग आहेत. किराणा दुकान चालवत त्यांचा संसार सुरु होता. अर्चना चव्हाण यांना दोन मुले आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.








