लटकलेल्या अवस्थेत आढळला भाजपा आमदाराचा मृतदेह

On: July 13, 2020 11:59 AM

कोलकाता :  पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्हयात भाजपा आमदाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. हेमताबादमधील भाजपाचे आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह एका दुकानाबाहेर मोकळ्या जागेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

देवेंद्र नाथ रे हे गेल्याच वर्षी सीपीएममधून भाजपात आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले होते. ज्या परिसरात आमदार देवेंद्र नाथ रे हे लटकलेल्या अवस्थेत आढळले, ते ठिकाण त्यांच्या निवासस्थानापासून एक किमी अंतरावर आहे. त्यांच्या परिवारातील एका सदस्याने सांगितले की, पहाटे एक वाजता काही लोक घरी आले होते. त्यांनी त्यांना बोलावून घराबाहेर नेले. या मृत्यूच्या चौकशीची मागणी आमदार परिवाराने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment