गुंगीचे औषध देत तरुणीवर नाशिकला अत्याचार

On: July 24, 2021 3:30 PM

नाशिक : गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचा व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. अत्याचार करणा-या तरुणाने पिडीतेला नांदवण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार पोलिस स्टेशनपर्यंत गेला. या घटनेप्रकरणी इंदिरा नगर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

पवन विश्वास वाघ (रा.साईबाबानगर,सिडको) असे संशयित तरुणाचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी पवन याने जून 2016 च्या कालावधीत तक्रारदार पिडीतेला गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याने या घटनेचा व्हिडीओ तयार केला. जी.डी. सावंत महाविद्यालयानजीक असलेल्या एका अपार्टमेंटमधे संशयीताने प्रथम अत्याचार केला. त्यानंतर या घटनेचा व्हीडीओ प्रसारीत करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला.

सन 2017 ते 2019 दरम्यान या कालावधीत नाशिक शहरातील विविध हॉटेलवर हा प्रकार झाला. त्याने तिच्यासोबत लग्न केले. मात्र लग्नाची नोंदणी केली नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment