भुसावळ खून प्रकरणातील फरार अटकेत

On: July 27, 2021 2:27 PM

जळगाव : वाढदिवसाच्या पार्टीत वादाचे पर्यावसन खूनात झाल्याची घटना भुसावळ येथे 16 जुलैच्या मध्यरात्री झाली होती. भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या गजानन महाराज मंदीरासमोर झालेल्या या घटनेत सचिन ज्ञानदेव भगत या तरुणाचा खून झाला होता. खुन झाल्यानंतर पसार झालेला संशयीत आरोपी प्रदीप छगन आलवे याला रावेर तालुक्यातील पाल येथून भल्या पहाटे ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

सचिन भगत या तरुणाचा वाढदिवस सुरु असतांना झालेल्या वादाच्या वेळी प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी याने एका मित्राच्या सोबतीने सचिन भगत याचा डोक्यात फावडा घालुन खुन केला होता. मुन्ना चौधरी या तरुणाला यापुर्वीच याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment