डोक्याला पिस्तुल लावत मारहाण? – पो.नि. पुराणिक यांच्यावर आरोप

On: July 27, 2021 4:25 PM

पुणे : पुणे वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी पोलिस स्टेशनमधेच इंटेरिअर डेकोरेटरच्या डोक्‍याला पिस्तूल लावत मारहाण केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली समर्थनगर पोलिस स्टेशनमधे त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. इंटेरिअर डेकोरेटरने घरातील डेकोरेशनचे काम निट केले नसल्याच्या कारणावरुन पुराणिक व डेकोरेटर यांच्यात वाद झाला होता. काम निट केले नाही म्हणून दिलेले पैसे त्याला परत मागण्यात आले असल्याचे डेकोरेटरचे म्हणणे आहे. कार्तिक रामनिवास ओझा असे फिर्यादी डेकोरेटरचे नाव आहे.

फिर्यादी कार्तिक रामनिवास ओझा यांनी पुणे वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या नाना पेठ येथील घराचे इंटेरिअर डेकोरेशन चे काम हाती घेतले होते. ओझा यांनी हाती घेतलेल्या पुराणिक यांच्या कामाचे कोटेशन दिल्यानंतरच काम सुरु केले होते. जवळपास सत्तर टक्के काम आटोपल्यानंतर कार्तिक ओझा यांनी उर्वरीत कामासाठी मजुरांची देणी देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यात पो.नि. पुराणिक यांनी अनेक त्रुटी काढल्याचे ओझा यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढील पैसे देणार नसल्याचे पुराणिक यांनी ओझा यांना बजावले. माझे पैसे परत दे नाहीतर कारवाई करतो अशी धमकी आपल्याला मिळाल्याचे ओझा यांचे म्हणणे आहे.

पो.नि. पुराणिक यांनी कार्तिक ओझा यांना समर्थ वाहतूक विभागात कामाची संपुर्ण कागदपत्रे घेऊन बोलवले. तेथे पैसे दिले नाही म्हणून तेथेच ओझा यांना तेथेच बेदम मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी कार्तिक ओझा यांच्या बहिणीने पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिल्यानंतर पुराणिक यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. समर्थ नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment