लाचेच्या जाळ्यात अडकल्या महिला उपजिल्हाधिकारी

On: July 28, 2021 6:27 PM

उस्मानाबाद : चतुर्थ श्रेणी कर्मचा-याच्या माध्यमातून विस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उस्मानाबाद (भूम)च्या उपजिल्हाधिकारी मनीषा राशिनकर यांच्याविरुद्ध आज (28 जुलै) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरमहा 1 लाख 10 हजार रुपयांची लाचेच्या स्वरुपात मागणी करण्याबाबत उप जिल्हाधिकारी महिलेस अटक करण्यात आली आहे.

ताकमोडवाडी ता.परंडा येथील एका वाळू वाहतूक व्यावसायिकास सुस्थितीत व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. दरमहा 1 लाख 10 हजार रुपयांच्या मागणीएवजी दरमहा 90 हजारात डील झाली होती. उपविभागीय कार्यालय भूम येथे मनिषा राशिनकर प्रतिनियुक्तीवर आहेत.

27 जुलैच्या (मंगळवार) सायंकाळी 6.59 वाजता भूम शहरातील अहमदनगर रस्त्यावरील आयडीबीआय बँकेनजीक चहाच्या टपरीजवळ हा सापळा रचण्यात आला. कोतवाल विलास जानकर याने लाचेचा पहिला हप्ता विस हजार रुपये घेताच त्याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर आणि कोतवाल विलास जानकर यांच्या विरुद्ध भूम पोलीस स्टेशनला आज (28 जुलै) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार भुम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संशयीत आरोपींना अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधिक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पुर्ण करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment