औरंगाबाद : क्रेडिट कार्डाच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी लक्ष्मण राठोड आणि धोंडीबा घोरपडे यांनी आरोपीला अटक करण्याच्या नावाखाली फिर्यादी महिलेच्या पतीच्या पैशाने दिल्ली, वैष्णौदेवी पर्यटन केल्याचा आरोप आहे. संबंधित वसुली कर्मचा-यांवर कठोर कारवाईसह तपासातील निष्काळजीपणा दुर होण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनानंतर या तपासाला वेग आल्याचे समजते.










