बंदूक साफ करताना मिस फायर – रेल्वे पोलिसकर्मी निलंबित

On: August 5, 2021 4:00 PM

बीड : पेट्रोलिंगदरम्यान बंदूकीची साफसफाई करतांना रेल्वे पोलिस कर्मचा-याकडून मिस फायरिंग झाल्याची परळीत झाली होती. या प्रकरणी वरिष्ठ अधिका-यांच्या चौकशीअंती सदर कर्मचा-याला सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.

24 जुलै रोजी परळी रेल्वे पोलिस पेट्रोलिंग ड्युटीवर होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी बाबूलाल चहार यांच्याकडून बंदूकीची साफसफाई करत असतांना अचानक मिस फायरींग झाले होते. सदर गोळी भितींवर लागली व प्राणहाणी टळली. रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी केली. परळीत येऊन अधिकारी वर्गाने चौकशी केली. या चौकशीअंती पोलिस कर्मचारी बाबुलाल चहार यास सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment