सिंधुबाई झाल्टे यांची परस्परविरोधी तक्रार दाखल

On: August 6, 2021 2:02 PM

जळगाव : अश्लिल शिवीगाळ, मारहाण व लज्जास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील नागसेन नगर भागातील चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या चौघांपैकी सिंधुबाई झाल्टे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.

सिंधुबाई झाल्टे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार 4 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी त्यांचा मुलगा मुकेश याच्या डोक्यावर संबंधित महिलेचा मुलगा दगडाने मारहाण करत होता. मुकेशच्या डोक्यातून रक्त निघत असल्याचे घटनास्थळी गेल्यावर त्यांना दिसून आले. त्यावेळी मुकेशची सोडवणूक करत असतांना संबंधीत महिलेच्या मुलाने आपला विनयभंग केल्याचे व धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली हे.कॉ. संजय धनगर पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment