चाकूच्या धाकावर पती-पत्नीला लुटणारे अटकेत

यवतमाळ : मोटार सायकल शिकण्यासाठी पतीसोबत गेलेल्या महिलेसह तिच्या पतीची लुट करणा-या चोरट्यांना अटक करण्यात आले आहे. 5 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेतील शुभम राठोड (25) रा. वैभव नगर, मंगल जाधव (23) जांभुळणी आणि सुरज चव्हाण (23) अशी अटकेतील तिघांची नावे आहे.

यवतमाळ शहरातील पाटीपुरा भागातील रजनीगंधा बनसोड या आपल्या पतीसह मोटार सायकल शिकण्याच्या निमीत्ताने गिट्टी खदान परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी मोटार सायकलने तिघे अनोळखी तरुण तेथे आले. चाकूच्या धाकावर तिघा तरुणांनी रजनीगंधा बनसोड व त्यांच्या पतीजवळ असलेले दोन्ही मोबाईल आणि रोख रक्कम जबरीने हिसकावून घेतली होती. या घटने प्रकरणी पलायन केलेल्या अनोळखी तिघांवर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अवधुतवाडी गुन्हे शोध पथकाने शुभम राठोड, मंगल जाधव आणि सुरज चव्हाण या तिघांना गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख राहुल गुहे, पथकातील सुरेश मेश्राम, गजानन वाटमोडे, गजानन दुधकोहळे, प्रशांत झोड, अश्विन पवार, सागर चिरडे, बबलू पठाण, समाधान कांबळे, सुधीर पुसदकर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here