पिस्तुलच्या धाकावर करोडोची मालमत्ता हडपण्याच्या आरोप, कुख्यात साहिलविरुद्ध गुन्हा


नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर  तरुणाच्या बळजबरी सह्या घेऊनकरोडोची मालमत्ता हडपल्याच्या आरोपाखाली बजाजनगर पोलीसातकुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्धगुन्हा दाखल झाला आहे. शशांक नथुजी चौधरी (३१) असे याप्रकरणातील पीडित तरुणाचे नाव आहे.

तो वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरनजीकच्या शेगाव येथील रहिवासी आहे. शशांक चौधरी यांच्या तक्रारीनुसार सुरेंद्र नगरातील सेंट्रल रेल्वे एम्प्लाईज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये ही प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीची मालकी प्रशांत चौधरी यांच्याकडे होती. ती हडपण्यासाठी आरोपी साहिल सय्यद, गिरीश गिरधर,संदीप बनसोड व त्याच्या तीन साथीदारांनी बनावट कागदपत्रे तयार केली.

मूळ मालकाचे मृत्युपत्र तयार करुन त्यावर बनावटी हस्ताक्षर केले.त्यानंतर चौधरी यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली. डोक्यावरपिस्तुल लावून जिवे ठार करण्याची धमकी देत त्यांच्या समझोता पत्रावर सही व अंगठा घेतला.

त्यानंतर संदीप बनसोड यांच्या नावे ही मालमत्ताकरण्यात आली. या प्रकरणी चौधरी यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. काल रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. साहिल विरुद्ध हा चौथा गुन्हा दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here