खेळात हरलेले ५० रुपये दिले नाही ; दोघा मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या

On: July 19, 2020 5:23 PM

अमृतसर: लुडो या खेळात हरलेले पन्नास रुपये दिले नाही म्हणून दोघा मित्रांनी त्यांच्याच मित्राची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघा मित्रांमध्ये पैशावरून वाद झाल्यानंतर हा धक्कादायी प्रकार घडला. आरोपी त्यांच्या मित्राला मद्यप्राशन करण्याच्या बहाण्याने त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या डोक्यात अवजड दगड मारुन त्याची निर्घृण हत्या केली. आरोपींनी मित्राचा मृतदेह घरापासून दीड किमी अंतरावर एका खड्ड्यात फेकून दिला.मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटनेनंतर चार दिवसांनी पोलिसांना मृत तरुणाचा मृतदेह सापडला.सुखजिंदर सिंह १४ जुलै रोजी त्याचे मित्र विशालदीप सिंह व मनीसोबत एका रिक्षात बसून लुडो हा खेळ खेळत होता. सुखजिंदर सिंह लुडो या खेळात ५० रुपये हरला. त्याने ते पैसे दिले नाही. त्यावरुन तिघात वाद झाला. त्यानंतर विशालदीपआणि मनी या दोघांनी मिळून सुखजिंदरला बेदम मारहाण केली. चिडलेल्या सुखजिंदरने विशालदीपच्या रिक्षाची काच फोडली. त्यानंतर त्यांच्यातला वाद काही वेळासाठी मिटला. काही वेळाने आरोपीचे आणखी काही मित्र त्या ठिकाणी आले. ते सुखजिंदरला मद्य पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेले.सुखजिंदर घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ अवतार सिंह याने आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपी सुखजिंदरला बळजबरी रिक्षात बसवून नेत असल्याचे आढळून आले. अवतारने त्याचा भाऊ बेपत्ता झाल्याबाबत मिसिंग दाखल केली. त्याच रात्री गुरू तेग बहादूर नगर परिसरातील खड्डयात सुखजिंदरचा मृतदेह आढळला.ताब्यातील आरोपींनी केवळ पन्नास रुपयांसाठी हत्या केल्याची कबुली पोलीस तपासात दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment