कोरोना रुग्णाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

On: July 19, 2020 8:36 PM

कल्याण: कल्याण डोंबिवली मनपाच्या टाटा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन एका रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी चार वाजता घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. प्रशांत कुंडलिक आंबेकर (40) असे आत्महत्या करणा-या रुग्णाचे नाव आहे. तो रुग्ण डोंबिवली येथील रहिवासी होता.

उडी घेत आत्महत्या करणाऱ्या प्रशांतला महापालिकेच्या टाटा आमंत्रा येथील कोविड केंद्रात भरती केले होते. नवव्या मजल्यावर त्याला रुम दिली होती. त्याला शुक्रवारी 17 जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो दार उघडत नव्हता. त्याची मानसिकता बिघडली असल्याचे सांगण्यात येते.


आज डॉक्टरांनी खूप प्रयत्न केल्यानंतर त्याने दार उघडले होते. डॉक्टर व स्टाफने त्याला खाली घेऊन जाण्याची तयारी सुरु केली होती. दरम्यान नवव्या मजल्यावरुन खाली येत असताना पाचव्या मजल्यावरुन प्रशांतने खाली उडी मारली. या अनपेक्षित घटनेमुळे डॉक्टर व स्टाफला धक्का बसला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment