अट्टल दुचाकी चोर एलसीबीच्या ताब्यात

On: July 20, 2020 8:12 PM

जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने आज पहुर कसबे येथून जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली असून त्याला पुढील तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जामनेर तालुक्यातील पहुर कसबे या गावी सागर लक्ष्मण हिरे हा चोरीची दुचाकी वापरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम यांना समजली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या सहका-यांना पुढील कारवाईसाठी रवाना केले होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून सागर हिरे  यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटार सायकलीसह ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत हे.कॉ. विकास वाघ, नंदलाल पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, दत्तात्रय बडगुजर यांनी सहभाग घेतला. ताब्यातील सागर हिरे याच्यावर यापुर्वी जामनेर व औरंगाबाद ग्रामीण पोलिस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या ताब्यात असलेली मोटार सायकल सोयगाव (औरंगाबाद ग्रामिण पोलिस स्टेशन) येथील चोरीच्या गुन्हयातील आहे. त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment