पोलिसात तक्रार दिल्याचा राग – चौघांकडून मारहाण

On: November 3, 2021 4:28 PM

जळगाव : विहीरीतील पाणी घेण्यास मज्जाव करण्यासह पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याचा राग आल्याने चौघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक पंडीत पाटील यांच्या धानवड येथील शेतात विहीर आहे. त्या विहीरीतून अरुण मधुकर पाटील हे जबरीने मोटार लावून पाणी घेतात असा अशोक पाटील यांचा आरोप आहे. या कारणावरुन अशोक पाटील व अरुण पाटील यांच्यात वाद आहे. या वादातून झालेल्या शिवीगाळ व मारहाण प्रकरणी अशोक पाटील यांचा मुलगा राजेंद्र याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

आपल्या विरुद्ध तक्रार केल्याचे समजताच अरुण मधुकर पाटील, जयवंताबाई पाटील, गोलू अरुण पाटील, पप्पू अरुण पाटील या चौघांनी 31 ऑक्टोबर रोजी लाकडी दांडके व कु-हाडीसह अशोक पाटील यांच्या घरात प्रवेश करत हल्ला केला. या घटनेत अशोक पाटील, त्यांची सुन, मुलगा व पत्नी असे चौघेजण जखमी झाले. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर अशोक पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात चौघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण पाटील व गोलू पाटील या दोघांना अटक करण्याची कारवाई सुरु होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment