पबजी खेळताना फुटला मोबाईल मुलांनी केले कोयत्याचे वार

On: July 22, 2020 10:03 PM

पुणे : पबजी गेम खेळताना मोबाईल फुटला. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी करत तिघा अल्पवयीन मुलांनी तरुणास बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेल्या काकाच्या हातावर त्या मुलांनी कोयत्याने वार करत जखमी केले. 

याप्रकरणी अभिषेक सिंग (१८) वडगाव शेरी यांनी चंदननगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. चंदननगर पोलिस स्टेशनला तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरी येथील साईनगर भागात २० जुलैच्या रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली होती. 

अभिषेक सिंग आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिषेकने पबजी गेम खेळण्यासाठी एकाचा मोबाईल घेतला होता. गेम खेळताना तो मोबाईल खाली पडला. त्यामुळे मोबाईलचे नुकसान झाले होते़. त्यामुळे ही मुले त्याच्याकडे नुकसानीचे ३ हजार रुपये मागत होते. 

गेल्या दोन महिन्यांपासून अभिषेक त्यांना पैसे देतो म्हणून सांगत होता मात्र पैसे देत नव्हता. ही मुले २० जुलैच्या रात्री अभिषेककडे आली व पैसे मागू लागली़. पैसे दिले नाही म्हणून त्याला मारहाण करु लागली. हा प्रकार त्याचे काका रुदलसिंग यांना समजला.

त्यांनी भांडण सोडवून मुलांना हाकलू लागले. काही वेळाने ही मुले पुन्हा आली. त्यांनी काकाच्या हातावर कोयत्याने वार करत त्यांना जखमी केले.तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही़ एस मिसाळ करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment