सांगवीत वाहनांची तोडफोड तीन अल्पवयीन मुले ताब्यात

पिंपरी : जुनी सांगवी परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास जवळपास १५ वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज पहाटे हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. दारुच्या नशेत आरोपीतांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.  

जुनी सांगवी परिसरातील ढोरेनगर, समता नगर, मुळा नगर, पवना नगर, प्रियदर्शनी नगर जवळपास दोन किलोमीटर परिसरात तिघा संशयित आरोपींनी सुमारे पंधरा खासगी वाहनांच्या काचा फोडून  नुकसान केले. यात एक रुग्णवाहिका, स्कूलबस व इतर काही चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

संगम नगर, पवना नगर व खडकी येथील तीन संशयितांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले. यातील एकावर यापूर्वी खडकी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याचे प्राथमिक तपासात उघड आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here