दोघा चिमुकल्यांना गळफास देत मातेने केली आत्महत्या

On: July 23, 2020 5:42 PM

धुळे : दोघा चिमुकल्यांना गळफास देत नंतर मातेने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची एक घटना धुळे जिल्हयाच्या साक्री तालुक्यात घडली आहे. या घटनेने धुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या घटनेतील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिता शिंदे (आई), रिया शिंदे (5) आणि भाग्यश्री शिंदे (3) या अशी या घटनेतील तिघा मृतांची नावे आहेत.

मातेने मुलांना मारुन स्वत: आत्महत्या का केली याचा उलगडा होवू शकला नाही. या प्रकरणी साक्री पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कायदेशीर प्रक्रीया सुरु केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तिघे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवले आहे. हत्या आणि आत्महत्येच्या कारणांच शोध लावला जात आहे. मयत अनिताचा पती आणि तिचे वडील सुतारकाम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment