मित्रच झाला मारेकरी दगडाने ठेचून केला खून

On: July 23, 2020 6:54 PM

पुणे : पुणे जिल्हयाच्या वाघोली येथील चोखीदाणी रस्त्यालगत एका कामगार तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला होता. लोणीकंद पोलीसांनी या गुन्हयाच्या तपासात कुठलाही पुरावा नसताना केवळ 36 तासांच्या आत दोघा आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

मद्य प्राशन करतांना झालेल्या जुन्या वादातून आरोपीने आपल्या सहकारी मित्रांच्या साथीने मित्राचा खून केल्याचे उघड झाले. दत्ता लक्ष्मण बडंगर(35) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी सागर कैलास पवार (27) आणि बालाजी किसन गोरे(29)या दोघा आरोपींना शिताफीने ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस पुढील तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यात पुणे जिल्हयातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. खून, मारामाऱ्या यांसारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. काल पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला होता. त्यात तो व्यावसायीक गंभीर जखमी झाला. मिलिंद मणेरीकर असे त्या जखमी व्यावसायीकाचे नाव आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment