मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

On: July 24, 2020 5:05 PM

औरंगाबाद : मोठ्या भावाने लहान भावाच्या छातीत चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली. आज सकाळी औरंगाबाद शहरातील जवाहरनगर भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. हल्ल्यानंतर मारेकरी पसार होण्यात यशस्वी झाला. सूर्यप्रताप ठाकूर (53) रा.परितोष विहार, जवाहरनगर असे मयत झालेल्या भावाचे नाव आहे. वेद प्रकाश ठाकूर (56) रा.पैठण असे ठार करुन फरार झालेल्या भावाचे नाव आहे.

सूर्य प्रताप आणि वेद प्रकाश हे दोघेही सख्खे भाऊ असून वेदप्रकाश हा पैठण येथे तर मयत सूर्यप्रताप हे औरंगाबादच्या जवाहर नगर भागातील रहिवासी होते. मरण पावलेले सुर्यप्रकाश हे एका खासगी कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होते. आज सकाळी साडे आठ वाजता मोठा भाऊ वेदप्रकाश हा पैठण औरंगाबाद येथे आला होता.

दोघेही भाऊ घरात असताना वेदप्रकाश याने घर बांधण्यासाठी सुर्यप्रकाश याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी सूर्यप्रताप यांची पत्नी दूध आणण्याससाठी शेजाऱ्यांकडे गेली होती. पैसे नसल्यामुळे सुर्यप्रताप यांनी वेदप्रकाश यास नकार दिला. या कारणावरुन दोघा भावात वाद निर्माण झाला. संतापाच्या भरात वेदप्रकाशने सूर्यप्रताप यांच्यावर धारदार सुऱ्याने वार केले.

सूर्यप्रताप रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळताच हल्लेखोर वेदप्रकाशने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे काढून टाकले. घरातील भावाचे कपडे घालून तो तेथून पसार झाला. दरम्यान काम करणाऱ्या बाईने वेदप्रकाश यास पळून जातांना पाहिले. तिने हा प्रकार मयताच्या पत्नीला जावून सांगीतला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. संतोष पाटील व त्यांचे सहकारी फरार भावाचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment