दोघा कोरोना रुग्णांचे पलायन; ठाणे पालिकेच्या रुग्णालयातील प्रकार

On: July 24, 2020 8:47 PM

ठाणे : येथील कळवा रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल झालेले दोन कोरोना रुग्ण आज फरार झाल्याची घटना घडली. या घटनेने रुग्णालय प्रशासनाची दमछाक झाली मात्र ते सापडले नाही.गेल्या पाच दिवसापासून या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला एक रुग्ण भिवंडी येथील तर दुसरा मुंबईच्या कोपरखैरणे येथील होता. दोघांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांची चाचणी पॉझीटीव्ह आली होती. त्यामुळे त्यांना दुस-या रुग्णालयात नेले जाणार होते.या दोघा रुग्णांची दुस-या दवाखान्यात नेण्याची तयारी सुरु होती. त्यातील भिवंडी येथील रुग्णाने आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचा बहाणा करत पलायन करण्यात यश मिळवले. दुसरा रुग्ण संधी साधून पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकाराची दखल घेत त्यांच्याविरोधात भिवंडी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment