नराधमाने केला बालकावर अत्याचार

On: July 24, 2020 11:26 PM

मुंबई : धारावीत एका नराधम तरुणाने आठ वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार केला आहे. खेळण्याचे व पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर झालेल्या या अत्याचाराच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. धारावीतील मरिअम्मा मंदिरानजीक ही घटना घडली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून काल रात्रीच त्याला सायन येथून अटक करण्यात आली आहे. २२ जुलैला दुपारच्या वेळी आरोपीने अल्पवयीन मुलाला खेळण्याचे व पैशांचे आमिष दाखवले होते. त्यावेळी निर्जन वस्तीचा अंदाज घेत त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केला.

त्यावेळी परिसरातील मुलाने हा प्रकार पाहताच आरोपीने तेथून पलायन केले. अत्याचारानंतर मुलाला त्रास सुरु झाला मात्र भीतीपोटी त्याने घरात कुणाला सांगितले नाही. मुलाला असह्य वेदना होत असल्याचे पाहून त्याच्या आईने विश्वासात घेत त्याची विचारपूस केली. त्यानंतर घटना उघडकीस आली. मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment