आधारवाडी जेलमधील दोघे आरोपी फरार

On: July 27, 2020 11:47 AM

कल्याण : जळगाव कारागृहातून तिघे आरोपी फरार झाल्याची घटना ताजी असतांना आज सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास आधारवाडी जेलच्या स्वागत कक्षाच्य भिंतीवरुन उडी मारुन दोघे आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

शाम प्रेमचंद चव्हाण (23) रा. चाळ क्रमांक 211 नेहरु नगर नवी वस्ती भिवंडी, ठाणे व अविनाश कैलास गायकवाड (21) रा. कैसद पैठण, औरंगाबाद अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघे आरोपी पळून गेल्यामुळे आधारवाडी जेल प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे.

शाम प्रेमचंद चव्हाण याच्यावर भिवंडी पोलिस स्टेशनला गु.र.न.211/20 भा.द.वि. 379, गु.र.न. 191/20 भा.द.वि.334, कोणगाव पो.स्टे येथे गु.र.न. 67/20 भा.द.वि.394 नुसार गुन्हे दाखल आहेत. अविनाश कैलास गायकवाड याच्यावर महात्मा फुले पो.स्टे (एमएफसी)  येथे भा.द.वि. 392 व 379 नुसार गुन्हे दाखल आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment