चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या

On: July 28, 2020 3:25 PM

पुणे : पती पत्नीप्रमाणे सोबत राहणा-या प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पुणे जिल्हयाच्या शिरुर शहरात घडली. शिरुर शहराजवळील वाडा कॉलनी परिसरात सारिका गिरमकर आणि दत्तात्रय गायकवाड हे प्रेमविर पती पत्नी प्रमाणे एकत्र रहात होते. चारित्र्याच्या संशयावरुन निर्माण झालेल्या वादातून प्रियकर दत्तात्रय गायकवाड याने प्रेयसी सारिका गिरमकर हिचा खून केल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर प्रियकर स्वत:च शिरुर पोलिस स्टेशनला हजर झाला. त्याने सारिकाच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली. दत्तात्रय गायकवाड हा तरुण शिरुर शहरात भाड्याच्य खोलीत रहात होता. तो रांजणगाव एमआयडीसी मधे एका कंपनीत चालक म्हणून कामाला होता. सारिका ही एका रुग्णालयात काम करण्यास जात होती. दोघांचे प्रेम जुळल्यानंतर ते गेल्या सात महिन्यांपासून पती पत्नीप्रमाणे एकत्र रहात होते.

घरमालकास त्याने सारिका ही आपली पत्नी असल्याचे सांगितले होते. दत्तात्रय हा सारिकावर नेहमीच चारित्र्याचा संशय घेत वाद घालत असे. त्यामुळे घरमालकाने त्यांना खोली रिकामी करण्यास सांगितले होते. अखेर या वादाची परिणीती सारिकाच्या हत्येत झाली. हत्येनंतर तो अगोदर कामाला निघून गेला व त्यानंतर पोलिसात हजर झाला. घरमालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार दत्तात्रय गायकवाड याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment