पुण्यातील तरुणीच्या हत्येचा लागला तपास मारेकरी नात्यातील अल्पवयीन तरुण

On: July 29, 2020 11:35 AM

पुणे :  पुणे जिल्हयाच्या खेड तालुक्यातील भामा-आसखेड थोपटेवाडी गावात एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे वास्तव पुढे आल्यामुळे या खून प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या हत्येतील मारेकरी नात्यातील एका अल्पवयीन तरुण निघाला आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीची हत्या केल्याचे पोलिसांजवळ कबुल केले आहे.

या खूनाबाबत तपासकामी चोहोबाजूने पोलिस तपास करत होते. मृतक तरुणीच्या परिवारातील काही सदस्यांची चौकशी केली असता वेगळीच माहीती पुढे आली. नात्यातील अल्पवयीन मुलाने एकतर्फी प्रेमातून या तरुणीची हत्या केल्याचे तपासात स्प्ष्ट झाले. मृत तरुणीने नात्यातील अल्पवयीन आरोपीला प्रेम संबंधाबाबत स्पष्ट नकार दिला होता. तो राग मनात धरून या अल्पवयीन मुलाने तरुणीची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह  धरणाजवळ असलेल्या झाडीत फेकून दिला होता.

चाकण पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रकाश धस यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. मारेकरी नात्यातील निघाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment